दापोली (प्रतिनिधी) - श्री वरजाई देवी ग्रामस्थ मंडळ, गिम्हवणे गोसावी वाडीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तसेच क्रिडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सर्वच कार्यक्रमांना गिम्हवणे, वणंद, दापोली शहर परीसरातील जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे आयोजकांचा कार्यक्रम आयोजनाचा मुळ उद्देश चांगलाच सफल झाला. दापोली तालुक्यातील गिम्हवणे गोसावीवाडी येथील श्री वरजाई देवी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवार्षिक श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली होती. त्यानिमित्ताने सगळ्यांसाठी विविध व्याधींनी त्रस्त असलेल्यांच्यासाठी खास मोफत आरोग्य तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. या मध्ये मधुमेह व रक्ततपासणी, पोटाचे व आतडयाचे विकार, हृदयविकार व तपासणी, किडनी स्टोन (मुतखडा), प्रोस्टेट तपासणी, सतत फिट येणे, आकडी येणे दमा तपासणी निदान व सल्ला याला मोफत आरोग्य विषयक तपासणी शिबिराला रुग्णांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्यविषयक तपासणीकरीता डॉ.कनक वनकर हे तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर बाॅक्स क्रिकेट सामने, गिम्हवणे आझादवाडी विकास मंडळ यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या श्रींच्या महाप्रसादाचाही परिसरातील अनेकांनी लाभ घेतला.
श्री वरजाई देवी ग्रामस्थ मंडळ गिम्हवणे गोसावीवाडीने विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर आरोग्यविषयक आयोजित केलेला मोफत तपासणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वरजाई देवी ग्रामस्थ मंडळ गिम्हवणेचे अध्यक्ष रोशन मंडपे, सल्लागार श्रीकांत मंडपे, माजी सेक्रेटरी राजेंद्र मंडपे, सेक्रेटरी प्रकाश गोसावी, भास्कर गोसावी, जयेश गोसावी, महिला मंडळ अध्यक्षा कविता मंडपे, सेक्रेटरी ऋतुजा मंडपे यांच्या कुशल नेतृत्वाखालील मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ महिला वर्ग आणि युवांनी मेहनत घेतली.




















































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.