loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेत आज दि. 4 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे मंडल अधिकारी कार्यालय मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराच्या आयोजन सोमवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 10:30 वाजता एस. एन. आयडियल हायस्कूल देवळे येथे आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 महसूल मंडळ स्तरावर आयोजित करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने देवळे मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी तहसीलदार कार्यालय देवरुख तालुका संगमेश्वर यांचे मार्फत आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर शिबिरात शासनाच्या इतर विषयांच्या योजनांची माहिती लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यांमध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्याची अनुषंगाने शासनामार्फत जनतेस सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व लाभ घ्यावा, असे देवळे मंडल अधिकारी व्ही. वाय. शिरोळे यांनी आव्हान केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg