loader
Breaking News
Breaking News
Foto

आज दि. ४ मे रोजी मोरगांव येथील श्री देव म्हाताराबाबा मंदिराचा वर्धापनदिन सोहळा

बांदा(प्रतिनिधी) - प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोरगांव येथील प्रसिद्ध व जागृत अशा श्री देव म्हाताराबाबा मंदिराचा वर्धापनदिन सोहळा आज सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० वा. श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभ स्थळी आगमन, सकाळी ८.३० ते ९.३० वा. श्री देव म्हाताराबाबा मूळस्थानावर व मंदिर आसनावर अभिषेक, सकाळी १०.०० ते १२.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा होईल त्यानंतर दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते सायं. ४.०० वा.तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ४.०० ते ६.०० वा.मोरगांव ग्रामस्थांचे भजन, सायं. ६.०० ते ७.०० वा.पावणी कार्यक्रम, सायं. ७.०० वा. सांज आरती, रात्रौ ८.०० वा.वैकुंठवासी ह.भ.प.प.पु. सद्गुरुवासुदेव महाराज वझे संत तुकाराम महाराज भजनी मंडळ (गोवा, महाराष्ट्र) यांचे भजन होईल. रात्रौ १० वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘जिव्हेश्वर’ हा ट्रीक सीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होईल. सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन देवदर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मोरगांव व श्री म्हाताराबाबा देवस्थान कमिटी मोरगांव, यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg