loader
Breaking News
Breaking News
Foto

मिर्ले येथे भावांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी

खेड : तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे दारूच्या नशेत लहान भावाच्या मुलाला विनाकारण मारहाण करणाऱ्या दुसऱ्या भावाला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने जाब विचारणाऱ्या भावाला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी त्याच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तीन माने बंधूमध्ये घडली. लहान भाऊ बबन माने याचा मुलगा मंगेश बबन माने याला भाऊ तुकाराम भागोजी माने हा विनाकारण मारहाण करत असताना याची विचारणा भाऊ संतोष भागोजी माने याने तुकाराम याला केली. याचा राग मनात धरून तुकाराम याने हातातील कोयतीने संतोष याच्या डोक्यात मारले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg