loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत बरसत असलेल्या पावसाच्या पाण्याने नदया, नाळे, परे, ओढे झाले प्रवाहीत

दापोली (प्रतिनिधी) : दापोलीत रविवारी सायंकाळपासून बरसत असलेल्या पावसाने दापोलीतील नद्या, परे, ओढे ,नाळे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे शेतीला लागणाऱ्या पाण्याची शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. सुरुवातीला सुरू झालेल्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र दापोली तालुक्यात रविवारी २८ जून रोजी पुन्हा एकदा पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरच पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील सगळीकडेच धबधबे, नद्या, नाळे, परे आणि ओढे हे पाण्याने दुथडी भरून वाहू लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काहीसा लांबलेला पाऊस सुरू झाला आणि त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे, त्यामुळे आता आपल्या शेतीला पाणी मिळेल याची शेतकऱ्यांना खात्री झाल्याने ते आनंदात आहेत. मागील वर्षी ११ मे ला सुरू झालेला पाऊस यावर्षी जून महिना संपत आला तरी काही केल्या बरसत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. तर पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत होती. यातून आज ना उद्या मार्ग निघेल मात्र वाढलेल्या कडक उन्हाच्या उष्म्याने अंगाची लाही लाही होत होती. कडक उन्हाचा उखाडा सहन होत नव्हता कधी एकदाचा पाऊस सुरू होतो आहे, असे सर्वांनाच झाले होते.

टाईम्स स्पेशल

त्यात मध्यंतरी पाऊस झाला आणि सर्वांनी निःश्वास टाकला. मात्र पुन्हा पाऊस गायब झाल्याने मोठीच समस्या निर्माण होते की काय असे सर्वांनाच झाले होते. त्यामुळे कधी पाऊस पडतोय यासाठी सगळ्यांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते. मात्र रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने सर्वांची सध्या तरी चिंता मिटवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg