loader
Breaking News
Breaking News
Foto

फुरूसच्या शाकीर तिसेकरचे ऑस्ट्रेलियातून कृत्रिम बुद्धिमत्तेत (AI) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण

खेड (प्रतिनिधी) - मुंबईतून बी.टेक. पदवी प्राप्त केलेल्या शाकीर हिशामुद्दीन तिसेकर याने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील यूटीसीमधून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयात विशेष प्राविण्यासह (हायर फर्स्ट क्लास) पदव्युत्तर पदवी पूर्ण करून महत्त्वपूर्ण शैक्षणिक यश संपादन केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे आधुनिक तंत्रज्ञानातील वेगाने विकसित होणारे आणि परिवर्तनशील क्षेत्र असून ते जगभरातील उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज अनेक देश यातील संशोधन, नवकल्पना आणि अनुप्रयोगांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. शाकीरने मिळवलेले हे यश त्याचे समर्पण, कठोर परिश्रम आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते. हिशामुद्दीन अमीन तिसेकर आणि शबनम तिसेकर या त्याच्या पालकांनीही मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली असून, त्यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व ओळखून शाकीरला त्याच्या शैक्षणिक प्रवासात सतत प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. शाकीरच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याच्या कुटुंबाच्या आणि फुरूस गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या घवघवीत यशाबद्दल नातेवाईक, मित्र, ग्रामस्थ आणि हितचिंतकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg