loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिल्याच मुसळधार पावसात मंडणगड-बाणकोट मार्ग खचला; पालवाणी फाट्याजवळ मोठ्या भेगा, दुर्घटनेचा धोका

खेड - मंडणगड तालुक्यातील पालवाणी फाटा परिसरात मंडणगड-बाणकोट मार्गावर पहिल्याच मुसळधार पावसाने रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे. मंडणगड येथील परिवार पार्कच्या पुढे व एचपी पेट्रोल पंपाच्या मागील भागादरम्यान (२८ जून) सायंकाळी सुमारे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याचा मोठा भाग खचल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग वाढल्याने रस्त्याखालची माती वाहून गेली आणि रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या. तसेच रस्त्याच्या कडील भाग पूर्णपणे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. घटनास्थळाची छायाचित्रे पाहता रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही या मार्गावरील पाणी निचऱ्याच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने पहिल्याच जोरदार पावसात रस्ता खचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणावरून जात नव्हते. अन्यथा कार, दुचाकी किंवा इतर वाहन रस्ता खचलेल्या भागात गेल्यास मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg