loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे दुबळेवाडी रस्त्याची दुरावस्था; चालणे झाले अवघड

दापोली (प्रतिनिधी) : गिम्हवणे दुबळेवाडी रस्त्यात ठिक-ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यात पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पडत असलेल्या पावसाचे पाणी तुंबून राहत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे तुंबून राहत असलेले पाणी हे लाल तांबड्या रंगाचे माती मिश्रित गढूळ पाणी असल्याने रस्त्यातील खड्ड्यांच्या खोलीची व्याप्ती ही ना वाहन चालकांच्या लक्षात ये ना पादचाऱ्यांना समजून येत. त्यामुळे रस्त्यातील पाणी भरलेले खड्डे तुडवत मार्गक्रमन करावे लागत आहे. आता कुठे नुकताच पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजून पावसाचा पुर्ण हंगाम हा बाकी आहे आज रस्त्याची अशी ही दैयनीय अवस्था असेल तर पुढील विचार न केलेलाच बरा अशा घटनेने वाटतं आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडीचे महत्व हे सर्वार्थाने अधिक आहे. गिम्हवणे गावची सर्वात मोठी वाडी असलेल्या या दुबळेवाडीत असलेले श्री श्रीराम मंदिर येथील महत्त्वाचे एक देवस्थान आहे तसेच येथील उंच टेकडीवर श्री भानेश्वराचे मुळ देवस्थान आहे. अशा या दोन्ही देवालयाच्या ठिकाणी दापोली आणि दापोली परिसरातील लोक श्रध्देने देव दर्शनाला जात असतात.

टाईम्स स्पेशल

तसेच दुबळेवाडीतील रहिवाशांनाही आपल्या घराकडे जाणारा असा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाचे वाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. अशा मार्गावर पडलेले मोठ मोठाले खड्डे हे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होणार नाही, यासाठी खड्डे बुजवून टाकणे गरजेचे झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg