दापोली (प्रतिनिधी) : कृषी महाविद्यालय, दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी 'रावे' उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील वणौशी येथे कार्यरत असताना दाभोळ समुद्रालगत वसलेल्या भिवबंदरला भेट दिली. दापोली तालुक्यातील भिवबंदर भेटीचे कृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी 'रावे' गटाचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांसोबत गटचर्चा हे होते. वणौशी गावाच्या भिवबंदरचे अध्यक्ष दत्तप्रसाद मोरे यांच्या अंगणात शेतकरी व विद्यार्थिनींमध्ये कृषीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये बियाण्यांचे वर्ग, बियाण्यांच्या पॅकेटवरील टॅग, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यासोबतच आंबा, काजू, नारळ, सुपारी व काही मसाला पिकांची लागवड, खत व्यवस्थापन, शासकीय मान्यता प्राप्त रोपवाटिकेतून रोपे घेणे, आंब्यामध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर, छाटणी, विविध वाण तसेच आंबा पुनरुज्जीवन याबाबत माहिती देण्यात आली.
यासोबतच शेतकऱ्यांनी त्यांचे पारंपरिक शेतीतील अनुभव सांगितले. या कार्यक्रमासाठी वाडीमधील काही प्रमुख शेतकरी उपस्थित होते. तसेच त्यांच्या विविध शंकांचे निरसन कृषीस्नेही गटाने केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वणौशी भिवबंदर वाडीचे अध्यक्ष दत्तप्रसाद मोरे यांच्या सहकार्याने करण्यात आले. या कार्यक्रमात सलोनी सावंत, समृद्धी जाधव, श्रावणी मोरे, साक्षी लोके, अंकिता मुंज, श्रुती बोबडे, तन्वी नादिवडेकर, कोमल झिरवाल व आकांक्षा गाडगे, निलम मदने या 'कृषीस्नेही' गटातील कृषीकन्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदरचा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. एम. जी. पालशेतकर, डॉ. रणजीत महाडिक तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

























































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.