loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरासह तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

सावंतवाडी - 'सात जन्म हाच पती मिळावा ' अशी मागणी करीत व जन्मो जन्मीच्या नात्याची वीण घट्ट धरून वडाला प्रदक्षिणा घालून पती देवाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करीत आज गावोगावच्या सावित्रींनी वडाचे पूजन केले. गावागावात सुवासिनींनी वटवृक्षाकडे एकत्र येत पूजन करीत वटपौर्णिमा साजरी केली. गावात वटवृक्षांचे पूजन केले असताना शहरातील काही भागात मात्र अनेकींनी वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून तसेच छोटी वडाची फांदी रोवून वटपौर्णिमा साजरी केली. काही सोसायट्यांमध्ये वडाचे रोप किंवा फांदी कुंडीत लावून सर्व महिला पूजेसाठी एकत्र आल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोशल मीडियावर अनेकींनी पूजा करतानाचे फोटो व रील्स पोस्ट केल्याचे पहायला मिळाले. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला. सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या संकेताला अनुसरून महिला यादिवशी वडाची पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात व वटवृक्षाचे पूजन करून आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. पूजेनंतर सुवासिनी एकमेकींना सौभाग्यवाण देतात.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडी शहरासह तालुक्यात याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातील महिलांनी एकत्र येत सौभाग्याचे वाण दिले. तर ग्रामीण भागातही वाड्या रस्त्यावर असलेल्या वटवृक्षांचे पूजन करून व सुतांचे वेस्टण करून सौभाग्याचे वाण देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg