loader
Breaking News
Breaking News
Foto

नसरापूर अत्याचार हत्या प्रकरण, नराधम आरोपीला फाशीच होणार - एकनाथ शिंदे

पुणे: जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीकडून यापूर्वीही अशाच प्रकारची कृत्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुराव्याअभावी तो दोन वेळा निर्दोष सुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या वेळी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीच व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधत सांत्वन केले. तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. पीडित कुटुंबाशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. मी कालपासून पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहे. त्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत.”

टाइम्स स्पेशल

यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत, “तुमच्या दुःखाची भरपाई कोणीच करू शकत नाही. माझ्याकडे सांत्वनासाठी शब्दही नाहीत. मात्र, आरोपीला कठोर शिक्षा मिळेल याची खात्री बाळगा,” असे सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारने या प्रकरणात जलदगतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. ते म्हणाले, “जसं काही राज्यांमध्ये अशा गुन्ह्यांवर तातडीने कठोर कारवाई केली जाते, तशीच कारवाई महाराष्ट्रातही व्हावी. आरोपीला काही महिने किंवा वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवण्यापेक्षा त्याला तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg