नवी दिल्ली : मतदारांनी मतदानासाठी विक्रमी उत्साह दाखवल्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतपरीक्षेचा निकाल आज, सोमवारी लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आपले वर्चस्व टिकवते की, भाजप प्रथमच सत्ता काबीज करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात ७७ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. २९४ पैकी २९३ जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या २३४ मतदारसंघांसाठी ६२ मतमोजणी केंद्रांवर सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून तीनस्तरीय सुरक्षा योजना सज्ज करण्यात आली आहे. द्रमुक, अण्णाद्रमुक आणि विजय यांच्या पक्षाच्या सहभागामुळे निकालाकडे विशेष लक्ष आहे. सुमारे १.२५ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ, विरोधी यूडीएफ आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यातील तिरंगी लढतीनंतर, सर्व १४० जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात ४३ ठिकाणी मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आसाममधील १२६ विधानसभा मतदारसंघांतील ४० मतमोजणी केंद्रांवर सोमवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होणार आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांच्या निवडणुकीची मतमोजणी पुद्दुचेरी, कारैकल, माहे आणि यानम या चार प्रदेशांमध्ये होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाजप नेते कुंदन सिंह यांच्या घराबाहेर गोळीबार झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.






































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.