loader
Breaking News
Breaking News
Foto

पश्चिम बंगाल मतमोजणी..! पहिला कल हाती, तृणमूल काँग्रेस 121 आणि भाजप 161 जागांवर आघाडीवर..!

देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोतणीला, आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हिमंता बिस्वा सरमांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला या निकालांवर अवलंबून आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलं आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्या हाती पुन्हा सत्ता येणार? की सत्तापालट होणार? याकडे लक्ष लागलं आहे. पश्चिम बंगालच्या मतमोजणी कल हाती आले असून तृणमूल काँग्रेस 121 आणि भाजप 161 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत येईल असे कल सांगत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg