loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल ९४.८२ टक्के

बांदा (प्रतिनिधी) - धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.८२ टक्के लागला आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या २५१ विद्यार्थ्यांपैकी २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून वाणिज्य शाखेची गंधाली प्रशांत धुरी ८५ टक्के गुण मिळवून प्रथम, अकाऊंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटची सोनाली तुकाराम हरमलकर ८४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा विग्नेश विष्णू मळगावकर हा ८३.६७टक्के गुण मिळवून तृतीय आला. प्रशालेचा शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे: कला शाखा प्रथम ऋषिकेश काशिनाथ पंडित ७३.१७टक्के, द्वितीय प्रेक्षा मुकेश वासानी ६८.१७ टक्के, तृतीय रेश्मा रवींद्र नाईक ६८.१७. विज्ञान शाखा: प्रथम विनित रवींद्र पंडित ८३.५० टक्के, द्वितीय आलिया अब्दुल मजीद खान ८०.५० टक्के, तृतीय पूर्वा उत्तम दळवी 78.50 टक्के.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाणिज्य शाखा - प्रथम गंधाली प्रशांत धुरी ८५ टक्के, द्वितीय रोशनी रामकृष्ण गावडे ७८.३३ टक्के, तृतीय कौशल्य आत्माराम मेस्त्री ७७ टक्के अकॉउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विभागः प्रथम सोनाली तुकाराम हरमलकर ८४.८३ टक्के, द्वितीय भक्ती विजय देसाई ७८.६७ टक्के, तृतीय समीक्षा शेखर नाईक ७८.३३ टक्के. इलेक्टिकल टेक्नॉलॉजी विभागः प्रथम विग्नेश विष्णू मळगावकर् ८३.६७ टक्के, द्वितीय यशदीप सत्यवान देसाई ५९.३३ टक्के, तृतीय साई सिद्धू कुंभार ५६.३३ टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg