loader
Breaking News
Breaking News
Foto

सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!

मुंबई ( प्रतिनिधी ) विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उबाठा गटाचे आमदार सचिन अहिर यांनी आज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सचिन अहिर हे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत सतत सावलीसारखे दिसायचे. ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. पण सध्याच्या पक्षांतराच्या लाटेत त्यांनी कठीण काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सचिन अहिर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. शरद पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रि‍पद, मुंबई अध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. अरुण गवळी यांचा भाचा अशी सचिन अहिर यांची ओळख होती. दक्षिण मुंबईचा भाग हा गिरणगाव म्हणून ओळखला जातो. इथे अनेक मिल्स होत्या. त्या मिल्सच्या युनियनच्या माध्यमातून काम करताना कामगार क्षेत्रातून सचिन अहिर यांनी राजकारणात प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

शरद पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg