सावंतवाडी: श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८९ वी पुण्यतिथी शनिवार, दिनांक ४ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या उपस्थितांना व विद्यार्थ्यांना "स्पर्धा परीक्षा तयारी" या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच, या कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयाच्या 'खेमराजीय' या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षणप्रेमींनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोसले, विश्वस्त व सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोसले, नियामक मंडळ सदस्य, सर्व सभासद तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.








































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.