loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत ४ जुलैपासून ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चे आयोजन; शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - क्रीडा क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने या वर्षीही पुण्यश्लोक हि.हा. श्रीमंत मेजर सर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा व कला स्पर्धा ४ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानावरील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रंगणार आहेत. ​या स्पर्धांमध्ये कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचा समावेश आहे. वयोगट व स्पर्धांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल: ​बॅडमिंटन स्पर्धा: इयत्ता १ ली ते ५ वी (विद्यार्थी व विद्यार्थिनी), इयत्ता ६ वी ते १० वी (विद्यार्थी व विद्यार्थिनी) आणि खुला गट. टेबल टेनिस स्पर्धा: १४ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी), १९ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी) आणि खुला गट. ​कॅरम स्पर्धा: १४ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी), १८ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी) आणि खुला गट - सिंगल व डबल. ​बुद्धिबळ स्पर्धा: ११ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी), १६ वर्षांखालील (विद्यार्थी व विद्यार्थिनी) आणि खुला गट.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​चित्रकला स्पर्धा: ​इयत्ता १ ली ते ५ वी (विषय: स्वच्छ सुंदर सावंतवाडी). ​इयत्ता ६ वी ते १० वी (विषय: पर्यटनाची पंढरी, मोती तलाव आणि सावंतवाडीचे वैभव). ​इयत्ता ११ वी ते १२ वी आणि (FY, SY, TY) महाविद्यालयीन गट (विषय: प्रजाहितदक्ष राजा - श्रीमंत बापूसाहेब महाराज). या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी फी माफ करण्यात आली आहे. खुल्या गटातील स्पर्धकांसाठी सिंगल प्रकाराकरिता १०० रुपये आणि डबल प्रकाराकरिता २०० रुपये एवढे प्रवेश शुल्क आकारले जाईल. स्पर्धेत प्रामुख्याने प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये, प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धक असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक खेळाडूस कोणत्याही एकाच क्रीडा प्रकारात आणि एकाच गटात खेळण्यास परवानगी असेल.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय व खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी आपली नावे १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातील संबंधित क्रीडा प्रकारातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नोंदवायची आहेत. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता जिमखाना येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल. तर स्पर्धांचा बक्षीस वितरण समारोह ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता याच ठिकाणी संपन्न होईल, अशी माहिती सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धा लखमराजे सावंत भोसले आणि आरोग्य व क्रीडा समितीचे सभापती सुधीर सुरेश आडिवरेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg