सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मध्ये शुक्रवारी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. सकाळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव भीम गर्जना बौद्ध मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दलामार्फत मानवंदना देण्यात आली. या नंतर त्रिशरण पंचशील म्हणून या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला मंडळाच्या वतीने ममता जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर शिरोडा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक सत्यवान कदम व त्यानंतर शिक्षिका पल्लवी जाधव यांचे प्रवचन पार पडले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मोहन जाधव यांनी केली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप जाधव हे होते. यावेळी कदम यांनी भगवान बुद्धाच्या शिकवणीचे विविध दाखले देत जगाला बुद्ध धम्माची कशी गरज आहे हे स्पष्ट केले व प्रत्येकाने पंचशील आचरण करावे असे आवाहन केले. अध्यक्षपदा दिलीप जाधव यांनी येत्या 17 मे रोजी होणाऱ्या धम्म परिषदेचे महत्त्व विशद केले. ही परिषद मानवाच्या कल्याणासाठी असल्याने सर्वांनीच या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले. शेवटी मंगेश कदम यांनी आभार मानले. यानंतर भीमगर्जना बौद्ध मंडळ मार्फत त्रि शरण व पंचशील पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अमन यशवंत जाधव प्रथम, यशस्वी योगेश जाधव द्वितीय तर आदित्य अजित जाधव तृतीय ठरले. उत्तेजनार्थ चैतन्या जयवंत जाधव यांना रोख बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमानंतर उस्फूर्त अभिनय सादरीकरण करण्यात आल. त्यात सातो से कला ग. व. नेमळे ग्रुप त्यांचा गौरव करण्यात आला.










































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.