loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी वरचीवाडी येथे घरफोडी; रोख रक्कम, दागिन्यांसह तीन लाखांची चोरी, संशयित ताब्यात

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - साटेली भेडशी वरचीवाडी येथे घरात कुणी नसल्याची संधी साधून काही अज्ञात चोरट्यांनी आशेशाव सालू रोड्रिक्स यांच्या घरात दरवाजाचे कुलुप तोडून प्रवेश करत रोख रक्कम तसेच दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरी केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी आलेल्या श्वान पथकाच्या माध्यमातून काही जणांना संशयित म्हणून उशिरा ताब्यात घेतले आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आशेशाव रॉड्रिक्स याने फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा आशेसाव रॉड्रिक्स यांच्या घरात कुणी नाही ही संधी साधून दोन ठिकाणी वरचीवाडी येथे घरफोडी केली. अज्ञात चोरटयानी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन काळया मण्याचे पिडूक असलेले मंगळसूत्र, हातातील ब्रेसलेट, सोन्याची माळ, दोन कानातील जोड, ५५ हजार रोख रक्कम, असा एकूण ३ लाख सात हजार रुपये मुद्देमाल चोरल्याने खळबळ उडाली आहे.

टाईम्स स्पेशल

घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात समजताच तातडीने हालचाली करून तपास करत ठसे तंज्ञ, श्वान पथक घटनास्थळी बोलवण्यात आले. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक आशिष भगत, पोलीस नाईक, यानी पंचनामा केला. दरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या श्वान पथकाच्या माध्यमातून काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg