loader
Breaking News
Breaking News
Foto

भोर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा द्या, दापोलीकरांचे तहसिलदारांना निवेदन

दापोली (चंद्रशेखर जोशी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या भीमराव कांबळे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी आज दापोलीतील नागरिकांनी दापोली येथील तहसील कार्यलयात जमून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी शासनाने कडक कायदा तयार करावा, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी प्रशांत परांजपे, मिलिंद शेठ, मिलिंद जोशी, अमेय फाटक, सचिन गायकवाड, परेश वैशंपायन, अजित जोशी, मयुरेश फाटक, ऍड. वृषाली दांडेकर यांचेसह दापोलीकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg