मुंबई : केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरणे स्वीकारून कामगार वर्गाचे खच्चीकरण सुरू केले आहे, त्याविरुद्ध इंटक शर्थिने लढेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी येथे केले. तर महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, असंघटित कामगारांना संघटित करणे, हेच इंटकचे ध्येय राहील! इंटकचा ७९ वा वर्धापन आज महाराष्ट्र इंटकच्या फोर्ट येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष आणि सरचिटणीस वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीपूर्ण स्मरणिचे प्रकाशन पार पडले.
इंटक वर्धापनदिनाच्या औचित्याने इंटकमध्ये निष्ठा आणि त्यागमयी वृत्तीने कार्य केलेल्या ज्येष्ठांचा स्मृतीचिन्हाने सन्मान करण्यात आला. इंटकची स्थापना ३ मे १९४७ रोजी झाली.त्या नंतर ३ महिन्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या वेळेपासून भारतातील सर्वात मोठी आणि प्रमुख केंद्रीय कामगार संघटना म्हणून ती ओळखली जाऊ लागली. त्या वेळच्या स्वातंत्र्य लढ्याला सक्रिय सहभाग लाभावा, याच सदहेतुने भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी संघटनेच्या निर्मितीत पुढाकार घेतला. संघटना निर्मितीत पंडित जवाहरलाल नेहरू, जगजीवन राम, गुलझारीला नंदा, हरीलाल शास्त्री, खंडूभाई देसाई आदी मान्यवरांचा प्रमुख सहभाग होता.
कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचे तर ते ध्येय होते. स्व.गं.द.आंबेकर यांनी इंटकचे अध्यक्षपद भूषविले आहे. इंटकच्या स्थापने मागे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जोडला गेला आहे. त्यामुळे इंटकच्या वर्धापनदिनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या गोष्टीना आजच्या वर्धापनदिनी अनेक वक्त्यांनी उजाळा दिला. कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण व जी.बी.गावडे, सेक्रेटरी मूकेश तिगोटे, देवराव सिंग आदींनी इंटकच्या वैभवशाली वाटचालीचा मागोवा घेतला. इचलकरंजीतील दिवंगत इंटकनेते श्यामराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.












































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.