मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थ्यांनी 'गोल्डन कॅटेगरी'मध्ये स्थान मिळवत शिष्यवृत्ती आणि पदक पटकावले, तर इयत्ता पाचवी व आठवीतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी 'सिल्वर कॅटेगरी'मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणे, तार्किक विचारशक्ती विकसित करणे आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दरवर्षी गणित संबोध, गणित प्रावीण्य, गणित प्रज्ञा तसेच इयत्ता दहावीसाठी गणित पारंगत परीक्षा आयोजित केल्या जातात. गणित प्रावीण्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गणित प्रज्ञा परीक्षेचे विशेष मार्गदर्शनही करण्यात येते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुबल यांनी दिली. यंदाच्या निकालात इयत्ता पाचवीतील पियुष विजय लाड, सोहम योगेंद्र धामापूरकर, उर्वी दत्तात्रय आठलेकर, राजनंदिनी चंद्रशेखर सावंत आणि पार्थ पंडित तेली या विद्यार्थ्यांनी 'गोल्डन कॅटेगरी'मध्ये स्थान मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला. याशिवाय इयत्ता पाचवी व आठवीतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी 'सिल्वर कॅटेगरी'मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. पाचवीतील पदक व शिष्यवृत्तीधारक गोल्डन कॅटेगरी मध्ये समावेश असलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे पियुष विजय लाड (जि. प. प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस), सोहम योगेंद्र धामापूरकर ( अ. शि दे.टोपीवाला हायस्कूल मालवण), उर्वी दत्तात्रय आठलेकर ( जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ४), राजनंदिनी चंद्रशेखर सावंत ( जि प. पू. प्रा. शाळा सावंतवाडी नं ४), पार्थ पंडित तेली ( विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली).
इयत्ता पाचवीमधील गुणवत्ता पात्र सिल्वर कॅटेगिरी मध्ये समावेश असलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे अनुप्रिया अजित राणे ( जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं ४), गार्गी भालचंद्र आजगावकर(कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा ), मीरा महादेव सामंत (एस एल देसाई विद्यालय पाट), कथित शशांक केणी ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ), मधुरा दीपक मिठबांवकर (अ.शि.दे टोपीवाला हायस्कूल मालवण ), प्राजक्ता रामचंद्र शृंगारे (जि. प. पू. प्राथमिक शाळा नेरूर शिरसोस ), जान्हवी निलेश तळगांवकर (अ.शि.दे टोपीवाला हायस्कूल मालवण), सावली शेखर सामंत ( कुडाळ हायस्कूल कुडाळ) उर्वी अमितकुमार टक्केकर ( जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं ४), आयुष उमेश भोई ( कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा), जय निवास सातार्डेकर ( बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ ), शुभम मिलिंद परुळेकर (जि. प. केंद्रशाळा परुळे नं. 3 ), रुद्र तुकाराम परब ( शांतिनिकेतन स्कूल सावंतवाडी ), श्रिया प्रवीण गोवेकर ( झाराप कांबळेवीर कुडाळ ), श्रीकर मंदार शुक्ला (जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं २), स्पृहा संदेश नाईक ( एस एल देसाई विद्यालय पाट ), प्रणिल सीताराम आडारकर ( लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणे ), वेदांत विजय साठे (जि. प. पू. प्राथमिक शाळा कुसबे ), नागेंद्र युवराज तारी ( भंडारी हायस्कूल मालवण ), रुद्र राहुल कानडे ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ) राघव भारत राऊळ (जि. प. शाळा माडखोल मेटवाडी ३), रुद्र अभिषेक देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ), यश प्रवीण सावंत ( मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी), आविष्कार चंद्रकांत कदम ( बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ).
इयत्ता आठवी मधील गुणवत्ता पात्र सिल्वर कॅटेगिरी मध्ये समावेश असलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे कर्तव्य तेजस बांदिवडेकर (आर. पी.डी हायस्कूल सावंतवाडी), करिष्मा पंकज मांजरेकर (मदर क्वीन स्कूल सावंतवाडी ), दुर्वा निलेश धुरी (साळगाव हायस्कूल कुडाळ) पार्थ जयंत वझे (कुडाळ हायस्कूल कुडाळ), दुर्वांक किशोर वालावलकर (कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी), वेद राजेंद्र जोशी (श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल देवगड), रितेश शैलेश पंधारे (उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड), आदिनाथ दत्तप्रसाद सामंत (अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे), शुभंकर सुदीप पाटकर (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), विश्वराज विजयसिंह सातपुते (एस एम हायस्कूल कणकवली), नाईक स्वराज भालचंद्र ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ ), रिया धनंजय परब ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), चैतन्य सुहास परुळेकर (अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे ),आंचल अशोक देसाई ( मुटाट हायस्कूल देवगड ), सिया रघुनाथ वालावलकर ( इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ ), संस्कृती सुदेश चिपकर ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला ), संस्कृती अशोक गावडे ( पणदूर हायस्कूल कुडाळ ), सर्वज्ञा सतीश गोठणकर ( बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ ), मैथिली संतोष पवार ( कुडाळ हायस्कूल कुडाळ ), अर्णव जयवंत रावण ( एस एम हायस्कूल कणकवली ), जानवी सुरेश गवंडे ( मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ), गौरी रत्नाकांत उदीगरे ( न्यू इंग्लिश स्कूल आचरा मालवण ), गार्गी राजेश परब ( कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी ), ओराई नारायण पंडित ( बॅ.नाथ पै विद्यालय कुडाळ). सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गुणगौरव सोहळ्यात राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या सर्व ५३ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुबल, कार्यवाह धोंडी गावडे, जिल्हा परीक्षा प्रमुख महेश चव्हाण, उपाध्यक्ष सुशीलकुमार कडुलकर, रामचंद्र भानुसे, प्रसाद पारकर, महामंडळ प्रतिनिधी भाऊसाहेब चवरे, राजाराम फर्जंद, सल्लागार औदुंबर भागवत, वामन खोत, तुकाराम पेडणेकर तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.