मुंबई. : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने आता अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत ठोस परिणाम न दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, अनेक विभागांमध्ये अपेक्षित महसूलवाढ झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि उत्पन्नवाढीसाठी ठोस कृती आराखडा राबविण्याचे आदेश दिले. सरनाईक यांनी स्पष्ट केले की, केवळ कारणे सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष महसूलवाढ झाली पाहिजे. प्रत्येक विभागाने उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करून प्रवासी संख्या वाढवणे, बससेवा अधिक सक्षम करणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे.
परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, या कालावधीत महसूलवाढीबाबत सकारात्मक परिणाम दिसले नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट बदली, पदावनती किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
















































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.