loader
Breaking News
Breaking News
Foto

जायंट्स गृप ऑफ रत्नागिरीतर्फे भाकर संस्थेत धान्यदान कार्यक्रम

रत्नागिरी : जायंट्स गृप ऑफ रत्नागिरीतर्फे रविवार २८ जून २०२६ रोजी भाकर संस्था, लांजा येथे भेट देऊन गहू, तांदूळ, खाद्यतेल, विविध डाळी, पोहे, रवा, शेंगदाणा, अंगाचा साबण, साखर, चहापावडर, खोबरेल तेल, बिस्कीट इत्यादी साहित्य दान देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे साहित्य पुढील ३ ते ४ महिने त्या वृद्धाश्रमातील रहिवाशांना पुरेल अशी आशा संस्थेचे सदस्य, देवेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य दान करणारी रत्नागिरीतील जायंट्स ही एकमेव संस्था आहे असे मत देखील देवेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. आश्रमातील रहिवाश्यांनी ह्या भेटीबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

जायंट्स गृप ऑफ रत्नागिरीतर्फे हा उपक्रम गेले काही वर्षे सातत्याने राबविला जात आहे. सदर धान्य दान कार्यक्रमासाठी महेश दामले, पराग गोडबोले, सुनील सहस्त्रबुध्दे, विनय जोशी, गजानन गिडये, बाबु भुते, प्रवीण डोंगरे, विजय पोकळे आणि डॉ.मिलिंद सावंत हे रत्नागिरी जायंट्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg