loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यात वटपौर्णिमा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाखाली गर्दी केली होती. हिंदू परंपरेनुसार अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. यावेळी महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून सात जन्म हाच पती मिळावा, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. पूजा, आरती आणि धार्मिक विधीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील अनेक गावांमध्ये व शहरांमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत पारंपारिक सांस्कृतिकचे जतन करण्यात आले. महिलांमध्ये उत्साह आनंद आणि धार्मिक श्रद्धेचे वातावरण सर्वत्र पहावयास मिळाले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील विविध भागांमध्ये सामाजिक ऐक्य सांस्कृतिक परंपरा आणि कौटुंबिक मूल्याचे दर्शन घडले. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा महिलांसाठी आनंदोत्सव ठरलेचे चित्र सर्वत्र दिसून आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg