खेड- तालुक्यातील सात्विनगाव जोशीवाडी येथे घराच्या छतावरील कचरा साफ करत असताना पत्रा तुटून खाली पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळू धोंडू नवरत (७६) असे मृत वृद्धाचे नाव असून, मुंबईतील के. ई. एम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सात्विनगाव येथील बाळू नवरत हे १९ एप्रिल रोजी सकाळी आपल्या राहत्या घराच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी चढले होते. कचरा साफ करत असताना अचानक छताचा पत्रा तुटला आणि ते सुमारे सात फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि कानातून रक्त येऊ लागले.
घटनेनंतर त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत लोटे-लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना १९ एप्रिल रोजी दुपारी मुंबईतील के. ई. एम रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृताचे नातू सागर संजय नवरत यांनी दिलेल्या माहितीवरून खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची ३०/२०२६ प्रमाणे बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

















































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.