loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) - पंचायत समिती वैभववाडी तालुका कृषी विभाग वैभववाडी आणि ग्रामपंचायत नांधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा कार्यक्रम बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (नाधवडे हेळकरवाडी रस्ता गांगो मंदिर शेजारी) नाधवडे येथे संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती सिद्धेश रावराणे उद्घाटक किशोर कुडतरकर, प्रगतशील शेतकरी, या कार्यक्रमाला तालुक्यातील जि. प. सदस्य व प. स. सदस्य उपस्थित राहणार आहेत. मार्गदर्शन डॉ प्रसाद देवधर भागीरथी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व उमाकांत पाटील उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली हे करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान कृषी अधिकारी निरंजन देशमुख जि. प कृषी अधिकारी क्रांता जाधव, नाधवडे सरपंच लीना पांचाळ यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg