loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) पक्षाकडून गुहागर समुद्रकिनार्‍यावर लाईफ गार्ड नेमण्याची मागणी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी गुहागर नगरपंचायतीतर्फे किनार्‍यावर लाईफ गार्ड/सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. परंतु सध्या ते कार्यरत नसल्याने समुद्रात भरती-ओहोटीचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांसाठी हा किनारा धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष गुहागर शहर यांच्या वतीने आज मुख्याधिकारी, गुहागर नगरपंचायत यांना निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्या : १. किनार्‍यावर तातडीने प्रशिक्षित लाईफ गार्ड यांची नियुक्ती करावी. २. सुरक्षा विषयक सूचना फलक, धोक्याच्या खुणा व रेस्क्यू साहित्य किनार्‍यावर उपलब्ध करावे. ३. सुट्टीचे दिवस व पर्यटन हंगामात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शहरप्रमुख सिद्धिविनायक जाधव, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, विभागप्रमुख पराग मालप, उपविभागप्रमुख शब्बीर माहीमकर, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, कल्पेश बागकर, युवासेना विभागप्रमुख सुजल होळम, आर्य पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी, गुहागर समुद्रकिनार्‍यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ गार्डची व्यवस्था तात्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दिनांक ०३ मे रोजी दोन पर्यटक पाण्यात बुडत असताना स्थानिक तरुणांनी त्यांना वाचवल्याची घटना ताजी असून, यामुळे लाईफ गार्डची निकड अधोरेखित झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg