रत्नागिरी - रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य उद्घाटन सोहळा खातू नाट्यमंदिर येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ५० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या या संस्थेच्या कार्याची माहिती देणारा माहितीपटही दाखविण्यात आला.
ज्या महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे, तिथेच आज 'प्रमुख पाहुणा' म्हणून या ऐतिहासिक क्षणी उपस्थित राहता आले, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले. जिल्हा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असून, त्यामध्ये अशा अनुभवी संस्थांचा मोलाचा हातभार आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये मोठा वाटा आहे. या महाविद्यालयाने केवळ पदव्या देण्याचे काम न करता सुसंस्कृत आणि गुणवंत पिढी घडवली असल्याचे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना नमूद केले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष तथा आजीव सभासद महेश नाईक, कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, उपाध्यक्ष ॲड.विलास पाटणे, मुकुंदराव जोशी, उपकार्याध्यक्ष विजयराव साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तालुकाप्रमुख बाबूशेठ म्हाप, मुन्ना सुर्वे यांच्यासह या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.





















































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.