loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बांधकाम विभागाला दणका : बाजारपेठेतील मुख्य रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर शहरातील बाजारपेठेतून जाणारा गुहागर-वेळदूर हा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. केवळ डागडुजी करून हा रस्ता 3-4 दिवसांत पुन्हा जैसे थे होतो. हा रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठ व वर्दळीच्या वस्तीतून जात असल्याने व्यापारी, स्थानिक नागरिक व पर्यटकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही नियोजन बांधकाम विभागाने केलेले नाही. ही बाब गंभीर असून, याची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष गुहागर शहरच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट बांधकाम उपविभाग, गुहागर कार्यालयावर धडक दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, "मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा देण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख सिद्धिविनायक जाधव, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, विभागप्रमुख पराग मालप, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, कल्पेश बागकर, युवासैनिक आर्य पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम विभागाने तातडीने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg