loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरासह तालुक्यात सोमवारी वटपौर्णिमा सण पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सुहासिनी महिलांनी वटवृक्षाची विधिवत पूजा करून पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सुखी संसारासाठी प्रार्थना केली. शहरातील विविध ठिकाणांबरोबरच ग्रामीण भागातही महिलांनी मोठ्या उत्साहाने या व्रताचे पालन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण शहरातील वटवृक्षाजवळ सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. मालवण तालुक्यात यंदा विवाहबद्ध झालेल्या अनेक नवविवाहित दांपत्यांनी प्रथमच एकत्रितपणे वटपौर्णिमेची पूजा करून या परंपरेचा आनंद लुटला. महिलांनी वटवृक्षाभोवती पवित्र धागा गुंडाळत अखंड सौभाग्य, पतीचे निरोगी व दीर्घ आयुष्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. पूजनानंतर एकमेकींना रानमेव्याचे वाण देत शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. अधूनमधून पडणाऱ्या पावसानेही वातावरणात अधिक प्रसन्नता निर्माण केली आणि उत्साहात कोणताही खंड पडू दिला नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg