loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसामुळे दिलासा, लोटेतील कारखाने सुरू

खेड (प्रतिनिधी) - जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसह पंचक्रोशीतील ग्रामपंचायतची पाण्याची समस्या सुटल्याने साऱ्यांनीच निःश्वास सोडला असून, कारखानदारांसह नागरिकांतून आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तब्बल तेरा दिवसांहून अधिक काळ लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील कारखाने आणि वसाहतीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या १९ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाने जूनचा उत्तरार्ध आला तरी हजेरी न लावल्यामुळे कारखाने बंद करण्याची वेळ औद्योगिक वसाहतीवर आली. त्याचबरोबर वाशिष्ठीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या १९ गावात टँकर फिरू लागले. मागील ४० वर्षात अशी पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली.

टाईम्स स्पेशल

पाऊस लांबल्याने कोयना नदीच्या पाणी पात्राने तळ गाठला. त्यामुळे वाशिष्ठीही कोरडी पडली आणि त्याचा परिणाम औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गावांना भीषण पाणीटंचाईच्या रूपाने बसला. मात्र रविवारी (दि. २८) दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पाणीटंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजताच नळाला पाणी आल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. कारखानदारही सुखावले असून, कामगारवर्गात चैतन्याचे वातावरण दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg