केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सह्याद्री पर्वतरांगांच्या हिरवीगार कुशीत २०२६ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 'सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धे'चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी'च्या माजी विद्यार्थी विचार मंचा'च्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धा हि विविध वयोगटातील धावपटूंसाठी ५ किमी, १० किमी आणि २१.०९७५ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा रोमांचक अंतरांची स्पर्धा असणार आहे. मराठी शाळा, भाषा आणि पर्यावरण संकल्पना घेऊन एक पाऊल पुढे टाकण्यात येत असून या मॅरेथॉनद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्यातून प्रेरणा घेऊन स्थानिक तरुणांना व्यायामाची सवय लावली जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल. सहभागी धावपटूंना आकर्षक रोख बक्षिसे, पदक, प्रमाणपत्रे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
माहे ऑगस्ट, २०२६ पासून online नोंदणी सुरू होईल. सर्व वयोगट, लिंग आणि पार्श्वभूमीतील धावपटूंना सहभागाचे आमंत्रण आहे. शिपोशीच्या या मॅरेथॉनमुळे युवक युवती मैदानी खेळांकडे आकर्षित होऊन सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील धावण्याची परंपरा कायम राहील, अशी माहीती पत्रकार परिषदेत आयोजकांकडून देण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी विद्यार्थी विचार मंचच्या वतीने दत्तप्रसाद कोलते, दीपक नागवेकर, राजेंद्र दळवी, संजय शिंदे, विकास बाईंग, गणेश बाईंग, राजू घडशी, अरविंद तरळ, मच्छिंद्र घाग, प्रकाश कडू, संगीता सावंत, हनुमंत कदम, सुभाष शिगम, संगीता पवार उपस्थित होते.
























































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.