दापोली : लोकनेते रा. वि. तथा बाबुरावजी बेलोसे यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ, शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ आणि इंदुमती यादव माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मान्यवरांच्या हस्ते रामचंद्र विठ्ठल बेलोसे तथा बाबुरावजी बेलोसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित अतिथी, मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी सांगितले की, आज व्यासपीठावर उपस्थित असलेली संचालक मंडळी ही बाबुरावजी बेलोसे यांच्यासोबत काम केलेली आहे. बाबुरावजी मंत्री असताना त्यांनी अर्थसंचय न करता लोकसंचयाचे काम केले, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘लोकनेते’ ठरले. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकानंतर महाविद्यालयाच्या ‘मंदार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंकाचे कार्यकारी संपादक डॉ. बाबासाहेब गुंजाळ यांनी बोलताना सांगितले की, परंपरेनुसार दरवर्षी २ मे रोजी ‘मंदार’ अंक प्रकाशित केला जातो. अंकाच्या निर्मितीसाठी संपूर्ण संपादकीय मंडळाचे योगदान मोलाचे असून त्यांचे त्यांनी आभार मानले. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी आपल्या मनोगतात बाबुरावजींसोबत काम करतानाचे अनुभव कथन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘मंदार’ अंकाचे मुखपृष्ठ आकर्षक व विशेष असल्याचे सांगत निवड समितीचे कौतुक केले. दापोलीत उच्च शिक्षणाचा पाया बाबुरावजी बेलोसे यांनी घातला असून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केद्रे उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या की, दादासाहेब बेलोसे हे एक युगपुरुष होते. दापोलीत त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांमुळेच आपली राजकीय वाटचाल सुरू झाली आणि आज या पदापर्यंत पोहोचता आले. त्यांनी दापोली, मंडणगड व खेड तालुक्यांच्या विकासाचा भक्कम पाया घातला. चांगले विचार व स्वच्छ राजकारण केल्यास समाजासाठी मोठे कार्य करता येते, याचे ते आदर्श उदाहरण होते. तसेच या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय लक्ष्मणराव यादव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, बाबुरावजी बेलोसे यांनी दापोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज दापोलीत कोकण कृषी विद्यापीठ, वराडकर-बेलोसे महाविद्यालय यांसारख्या अनेक शैक्षणिक संस्था व पर्यटन केंद्रे उभी राहिली आहेत. बाबुरावजींच्या कार्याचा ठेवा जपण्यासाठी दापोलीत त्यांचे भव्य स्मारक उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाबूरावजींच्या सृतीदिनानिमित्त दापोलीतील उपस्थित नागरिक, बाबुरावजींना प्रेम करणारे कार्यकर्ते तसेच संस्थेचे विश्वस्त, संचालक, कुटुंबातील सदस्य यांमध्ये श्रीमती सुनिताताई बेलोसे, श्रीमती जानकीताई बेलोसे, मधुकर दळवी, कासमभाई मालदार, परशुराम दळवी इत्यादींनी बाबुरावजींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एल. पी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. एस. एस. खताते आणि मानसी कोवळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.