loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनवेल मुख्य रस्त्यावर दरड कोसळली

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीत भर पडताना दिसून येत आहे. अंजनवेल बौध्दवाडी मुख्य रस्त्यावर दरड कोसळली असून वेळीच उपाययोजना न केल्यास व रात्रभर पाऊस पडल्यास अधिक दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मुख्य मार्ग बंद होण्याची शक्यता तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच मौजे पाचेरीआगर काजरोळकरवाडी रस्त्यावर झाड पडून वाहतूक बंद झाली आहे. मौजे गुहागर येथील विलास बाळकृष्ण नार्वेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले असून अंदाजित 35 हजार 400 रु. इतके नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पाभरे खुर्द येथील सुरेश पांडुरंग आगरे यांच्या गोठ्यावर झाड पडून गोठ्याचे नुकसान झाले. पाभरे खुर्द येथील विजय रत्नाकर पाष्टे यांच्या घराजवळील संरक्षण भिंत कोसळली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, तालुक्यातील काही गावांच्या एसटी मार्गावर रस्त्यालगत झाडी वाढली असून वाहतुकीला अडथळा येत आहे. काही ठिकाणी झाडी मारलेलीच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg