loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेज खेडचा १२ वी विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १००%

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल पुणेच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल ऍण्ड ज्यु कोलेज, खेड मधुन विज्ञान शाखेतून ५४ विदयार्थी तर वाणिज्य शाखेतून ५८ विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. सदर परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विज्ञान शाखा : कडवेकर अमान मुनावर - ८७.०० % (प्रथम क्रमांक), साखरकर अलमा ताहिरखान-८५.०० % (द्वितीय कमांक), उतरकर रिबना मोहम्मदअली-७६.६७ %(तृतीय क्रमांक) वाणिज्य शाखा : बिजले मोहम्मद जाहिद सादीक-९१.८३ % (प्रथम क्रमांक), रावल नाबिया नियाज-८९.३३ %(द्वितीय क्रमांक), ठाकूर अमिना अफजल-८८.३३ % (तृतीय क्रमांक) विज्ञान व वाणिज्य शाखेतील विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल ऍण्ड ज्यु कॉलेज, खेड चे नाव उज्ज्वल केले आहे.

टाइम्स स्पेशल

विदयार्थानी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ज्यु. कॉलेजचे शिक्षक मुबिन खोत, शोएब बुरोंडकर, चोगले शहाब , रॉय, भवानी, खोत आफरीन, चोगले तनजीम, कादिरी शगुफ्ता, मुसा सिमरन, मुतव्वली फरहीन या सर्व शिक्षकांनी व विदयार्थ्यानी अथक परिश्रम करून यश मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg