loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली रस्त्यावरील खड्डयाविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बांदा मुख्य मार्गावर सासोली येथील एका वळणावर भला मोठा खड्डा पडला आहे. रस्ता खचला आहे. हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात होणार आहे. दोडामार्ग बांधकाम विभाग यांनी चार दिवसांत खड्डा बुजवला नाही, रस्ता सुरळीत केला नाही, तर ठाकरे शिवसेना बांधकाम कार्यालयाला टाळे लावणार, असा इशारा मणेरी शिवसेना विभाग प्रमुख भिवा गवस यांनी दिला आहे. सासोली येथील धोकादायक वळणावर जीवन प्राधिकरण विभाग यांनी जलवाहिनी तर दुसऱ्या बाजूने सीएनजी गॅस लाईन खोदकाम केले, यामुळे रस्ता खचून खड्डा पडला आहे. एका बाजूला मधोमध खड्डा पडून रस्ता खचला आहे. या ठिकाणी हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या निदर्शनास हा खड्डा आणून दिला तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. तसेच कळणे येथे एका ठिकाणी मोऱ्यांच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. येथे खडी टाकून देखील डांबरीकरण केले नाही. पावसाळा जवळ आला आहे. चार दिवसांत वरिल दोन्ही ठिकाणी खड्डा बुजवला नाही तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते टाळे लावणार, असा इशारा भिवा गवस यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg