दापोली(प्रतिनिधी):- दापोलीत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व तसेच सेवाभावी वृत्तीने काम करणार्या गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची दापोली लायन्स क्लब अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्यावर दापोलीतून अभिनंदनाच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदाचा मान प्राप्त झालेल्या गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांच्या अध्यक्षपदाचा शपथविधी समारंभ शनिवारी ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ‘पितांबरी रुचियाना रेस्टॉरंट’, साखळोली, तालुका, दापोली येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘गुरुप्रसाद बेर्डे हे दापोलीचे रहिवासी असून त्यांचे संपूर्ण शिक्षण ‘दापोली’ येथे झाले आहे. त्यांनी ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली’ येथून सन २००४ मध्ये कृषी पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते वसई येथे ‘वैतरणा डेअरी’ या नावाने दूध पुरवठा व्यवसाय करीत असून, पितांबरी कंपनीमध्येही कार्यरत आहेत. समाजसेवेचे बाळकडू लाभलेल्या गुरुप्रसाद बेर्डे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘लायन्स क्लब दापोली’ने त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब दापोलीमार्फत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, गरजूंना मदत तसेच विविध लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.


























































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.