सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिमासिक संगीत सभेअंतर्गत ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गीतांवर आधारित ‘घन बरसत बरसत आले’ या विशेष संगीत कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकापेक्षा एक सरस गीतांच सादरीकरण यावेळी करण्यात आले. सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कूल सभागृह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सुखटणकर, कोठावळे, दिनकर परब, नंदकुमार प्रभुदेसाई, निलेश मेस्त्री, किशोर सावंत, एच. बी. सावंत, भाई देऊलकर, किरण सिद्धये, बाळ पुराणिक, गायत्री देशपांडे, संजना परब, सेलेस्तिन शिरोडकर, सोमा सावंत, कवी दादा मडकईकर, अर्चना वझे, काजल जोशी, सुनिल गोवेकर, सुवर्णा प्रभुदेसाई, चंद्रकांत घाटे, राजू डोंगरे, गौरवी घाटे, प्रसन्न कुडतरकर अन्य मान्यवर, दर्दी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मैफीलीत श्रीनिवास खळे यांच्या अजरामर गीतांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांसमोर सादर करण्यात आला. यामध्ये जय जय महाराष्ट्र माझा, खेळ मांडियेला, एका तळ्यात होती, घन बरसत बरसत आले, काळ देहासी, जेव्हा तुझ्या बटांना, या चिमण्यांनो परत फिरा रे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे आदी सदाबहार गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना निलेश मेस्त्री यांची होती.
श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या मानसी भोसले,आशा मुळीक, वैष्णवी कानियाळकर, अनुष्का पालव, सानिका जाधव, मानसी वझे, केतकी सावंत, पूजा दळवी, चिन्मयी मेस्त्री, अलिशा मेस्त्री, अनामिका मेस्त्री, नेहा दळवी, वर्षा देवण, भास्कर मेस्त्री, सानिका सासोलकर, नितीन धामापूरकर, हेमंत गोडकर, सिद्धी परब, समृद्धी सावंत, निधी जोशी आदींनी ही सदाबहार गीते सादर केली. यावेळी हार्मोनियम निलेश मेस्त्री, ऑर्गन मंगेश मेस्त्री, तबला किशोर सावंत व निरज भोसले, सिद्धेश सावंत आदींनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले.





























































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.