loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड तोंडली येथील ग्रामदेवता श्री मानाई देवी उत्सव वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंडणगड (प्रतिनिधी) - संकट काळात भक्ताच्या हाकेला सत्वर धावणारी भक्तांची सारी विघ्ने दुर करणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती पसरलेल्या तोंडली ग्रामदेवता श्री मानाई देवीचा उत्सव वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ८ मे ते शनिवार दिनांक ९ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीत तोंडली ग्रामविकास मंडळ (रजि.) आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रिडा विषयक अशा विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मंडणगड तालुक्यातील तोंडली गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीच्या उत्सव वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी ८ मे २०२६ रोजी सकाळी ठिक ८ वाजता श्री मानाई देवी सुपर स्टार क्रिकेट संघ तोंडली आयोजित तोंडली प्रिमियर लीग (पर्व ४ थे) ओव्हरआर्म भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर रात्री ठिक ८ वाजता फॅन्सी गरबा (दांडिया नृत्याचा) कार्यक्रम पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी ९ मे २०२६ रोजी श्री मानाईदेवीच्या उत्सव वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम असून कार्यक्रमाच्या या मुख्य दिवशी म्हणजेच शनिवारी ९ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामदेवता श्री मानाईदेवीच्या मंदिरातील देवींच्या मूर्तीना मुकूट परिधान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम, दुपारी २ वाजता तोंडली महिला मंडळाकडून खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, दुपारी ३ वाजता खेळाच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता तोंडली आतले या दोन गावांना जोडणाऱ्या भारजा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. राजेश महाराज आंबडस्कर आणि सहकारी हे हरिपाठाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्रौ ८.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. त्यानंतर रात्रौ ९ वाजता मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच रात्रौ १० वाजता श्री मानाईदेवी सांस्कृतिक कलामंच तोंडली आयोजित सांस्कृतिक नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. तोंडली ग्रामविकास मंडळ (रजि.) आणि तोंडली महिला मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा या धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मुंबई मंडळाचे अध्यक्ष मनोहर कदम, उपाध्यक्ष राजेंद्र नागले, सचिव प्रतिक भुवड, खजिनदार स्वप्निल गोरीवले, ग्रामीण अध्यक्ष प्रताप चिलबे, उपाध्यक्ष विलास होडबे, सचिव दिलिप नागले, खजिनदार रमेश चव्हाण आणि महिला मंडळ अध्यक्षा प्रज्ञा फडणीस, उपाध्यक्ष नमिता पवार, सचिव रश्मिला नागले, खजिनदार दिलिशा कळंबटे यांनी तोंडली ग्रामविकास मंडळ (रजि.) आणि तोंडली महिला मंडळाच्या वतीने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg