loader
Breaking News
Breaking News
Foto

मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना 'कोकण रत्न सन्मान २०२६ पुरस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) - विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या वतीने देण्यात येणारा कोकण रत्न सन्मान २०२६ पुरस्कार मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिंधुदुर्ग संस्थेकडून सन्मान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. पिंगुळी येथील कला अंगणात विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'कला आंगण महोत्सव २०२६' मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या माध्यमातून संतोष नाईक यांनी आपल्या विशेष योगदानातून कोकणातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. तसेच सार्वजनिक सामाजिक समस्या व वैयक्तिक वंचित घटकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत. या कार्याची व्याप्ती वाढावी आणि सर्व सामान्यांना न्याय मिळाला यासाठी संघटना उभारण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. ​पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले की, संतोष नाईक यांनी आपल्या कार्यातून कोकणात चांगले संघटन उभे करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांचे हे कार्य यापुढेही अधिक जोमाने सुरू रहावे तसेच मानवाधिकार संघटनेने सामाजिक, सार्वजनिक विषयावर अधिक चांगले कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

यावेळी व्यासपीठावर चेतन गंगावणे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर संपदा नाईक, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष तनवीर खतीब, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, कायदेविषयक सल्लागार ॲड.संदीप चांदेकर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, जिल्हा महिला संघटक शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष तथा नगरसेविका शर्वरी धारगळकर, रायगड जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष राज बोथरे, सावंतवाडी तालुका सदस्य पूजा नाईक, सुप्रिया धारणकर, रेश्मा परब, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, कणकवली ट्रॉफी हाऊसचे संचालक श्री. व सौ. महेंद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील मानवाधिकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg