खेड : तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे किराणा दुकानात झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणीला मारहाण झाल्याची घटना ३ मे रोजी दुपारी घडली असून, या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश संजय भालेकर (वय २४, रा. लोटेमाळ, माळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची चुलत बहीण गौरी भालेकर व तिची मैत्रीण स्वरा काते या दोघी रसीका शंकर नलावडे यांच्या मालकीच्या 'मातोश्री किराणा स्टोअर्स' येथे चिकन मसाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गौरी भालेकर हिने नलावडे यांच्याशी एकेरी भाषेत संवाद साधल्याने वाद निर्माण झाला. या वादातून संतप्त झालेल्या नलावडे यांनी दुकानातील काठीच्या साहाय्याने गौरी भालेकर हिला मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ही बाब समजताच फिर्यादी नितेश भालेकर यांनी रसीका नलावडे यांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर नलावडे यांनी त्यांच्याशीही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या गौरी भालेकर हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८ (१) व १११ (२) नुसार गुन्हा क्रमांक १२७/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.
































































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.