loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंब्रल गावातील कलाकार किशोर सावंत इंडियन आयडॉलमध्ये, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कुंब्रल गावातील रहिवासी, मुंबई चाकरमानी किशोर सावंत यांनी २८ जून रोजी सोनी टीव्ही वर सादर झालेल्या इंडियन आयडॉलमध्ये सादर केलेला कलाविष्काराला उंदड प्रतिसाद मिळाला. मुंबईतील चाकरमानी तसेच दोडामार्ग तालुकावासीय कुंब्रल गावातील ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम पाहुन आपल्या गावातील कलाकाराला प्रतिसाद दिला. किशोर सावंत यांच्या कलेची दखल घेत इंडियन आयडॉल या सोनी टीव्हीवरील जगप्रसिद्ध कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी दिली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील रहिवासी तसेच मुंबई या ठिकाणी स्थायिक चाकरमानी किशोर शंकर सावंत, आपल्या विविध कला सादर करून एक वेगळ विश्व निर्माण केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, मुलांचे वाढदिवस मध्ये आपल्या कलेचे अविष्कार सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद घेत दोडामार्ग तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नेणार्‍या या किशोर सावंत यांनी विविध कला अविष्कार सादर करून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg