loader
Breaking News
Breaking News
Foto

चेक बाऊन्स प्रकरणामध्ये आरोपीला देवरुख कोर्टाची शिक्षा, १५ लाखांचा दंड आणि कारावास

देवरूख: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांनी कर्ज वसुलीसाठी दिलेला धनादेश बँकेत बाऊन्स करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला मा. न्यायालयाधिकारी वर्ग १, देवरुख यांनी शिक्षा सुनावून जोरदार चपराक लगावली आहे. मा. न्यायालयाधिकारी वर्ग १, देवरुख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे तपासून आरोपी प्रथमेश शिवाजी पवार यांना दोषी ठरवून रु. १५ लाख भरण्यासाठी २० दिवसांची मुदत व त्यासाठी कैदेचा आदेश दिला असून आरोपीने रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षा सुनावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपी प्रथमेश शिवाजी पवार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेमार्फत कर्ज घेतलेले असून थकीत कर्जाच्या वसुलीपोटी प्रथमेश पवार यांनी बँकेला चेक दिला होता. परंतु खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे सदरचा चेक बाऊन्स झाला होता. त्यानुषंगाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा–देवरुख यांनी मा. न्यायालयाधिकारी वर्ग १, देवरुख येथे Negotiable Instrument Act, Section 138 अंतर्गत केस दाखल केली होती.

टाईम्स स्पेशल

सदर खटल्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा–देवरुख चे वकील यांनी बँकेच्या वतीने बँकेचे दस्तऐवज, कायदेशीर व्यवहाराचे भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. सादर केलेले दस्तऐवज व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रथमेश शिवाजी पवार यांना रु. १५ लाख दंड व कैद अशी शिक्षा देत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. बँकिंग व्यवहारामध्ये चेकद्वारे दिलेली विश्वासार्हता टिकून राहणे गरजेचे आहे. जाणूनबुजून चेक बाऊन्स करणे हा दिवाणी वाद नसून, तो आर्थिक व्यवस्थेला आणि विश्वासाला तडा देणारा फौजदारी गुन्हा आहे व अशा प्रवृत्तीला आळा बसणे आवश्यक आहे, असे मा. न्यायालयाने स्पष्ट मत नोंदविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg