loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत लांबलेल्या पावसाने नाचणीच्या रोपांची उगवण उशीरा

दापोली(प्रतिनिधी) - खरीप हंगामात लागवड केल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी ‘नाचणी’ महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) असे आहे. अशा या पिकाला लांबलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून पेरणी केलेल्या नाचणीची उगवण उशीरानेच होत आहे. त्यामुळे नाचणीची लागवड रखडली आहे. नाचणी हे गवतवर्गीय कुळातील महत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म आहे. या धान्याचा आकार लहान असून हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पिकांमध्ये सी-४ पद्धतीने प्रकाश संश्लेषण (मका, ऊस, ज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्‌ये जसे की, कमी ऊंची, पानांचा लहान आकार, कणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. नाचणीच्या लागवडीसाठी मार्च, एप्रिल महिन्यात डोंगरउतारावरील जमिनीतील जाळीजळी झाडेझडपे तोडून ती जाळून जमिनीची नांगरणीकरून जमीन तयार करतात.

टाईम्स स्पेशल

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवरच नाचणीचे बी पेरून त्याची उगवण झाल्यानेपावसाळ्यात जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाचणी पिकाची लागवड शेतकरी करतात. यंदा जून संपत आला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नाचणीसह भाताची लागवड रखडली आहे. नाचणी हे औषधी पीक आहे. त्याचबरोबर नाचणीची भाकरी, खीर, वड्या, पापड, नाचणी सत्त्व असे विविध प्रकार अधिक किमतीला शहरात विकले जातात. मात्र याची कल्पना शेतकर्‍यांना नाही. कृषी विभागाने नाचणी पिकाचे महत्त्व सांगण्याबरोबरच पीक वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg