loader
Breaking News
Breaking News
Foto

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना , शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू ,१० जखमी

मुंबई: मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलेमोठे झाड कोसळले. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 10 विद्यार्थी जखमी झाले. मुंबईत एका शालेय बसवर मोठे झाड कोसळल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. ही घटना चेंबूर रोड क्रमांक 11 वर घडली. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 13 मुले होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई अग्निशमन दल (MFB) तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये 13 शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे.

टाइम्स स्पेशल

स्थानिकांचा आरोप आहे की, या परिसरात यापूर्वीही अशाच घटना घडल्या असल्याने, झाडे छाटण्याची किंवा काढून टाकण्याची विनंती करत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) अनेक वेळा पत्र लिहिले होते. वारंवार सूचना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg