loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंहगड माऊंटन मॅरेथॉनमध्ये क्रीडा शिक्षक अनिकेत पवार प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सिंहगड (पुणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या 11 किलोमीटर माऊंटन मॅरेथॉन' स्पर्धेत लांजा तालुक्यातील विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लांजाचे क्रीडा शिक्षक अनिकेत विक्रम पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून स्पर्धा 1 तास 9 सेकंदात अंतर पार करून आता पर्यंतच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत टायमिंगचा नवा विक्रम केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण परिसरातून आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विद्यादीप हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अत्यंत खडतर चढ-उतार, कठीण मार्ग आणि तीव्र आव्हाने असलेल्या या 11 किमीच्या माऊंटन मॅरेथॉनमध्ये देशभरातून अनेक नामांकित धावपटू सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत अनिकेत पवार यानी जेतेपद पटकावले आहे. हे यश त्यांना सहज मिळालेले नाही, तर कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सातत्याने संघर्ष करत त्यांनी आपला सराव चालू ठेवला होता. नित्य नियमाने, कठोर शिस्त आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध करत हे घवघवीत यश संपादन केले आहे.

टाईम्स स्पेशल

पवार यांच्या यशाचा आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील समृद्ध अनुभवाचा थेट फायदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजण्यासोबतच मॅरेथॉन आणि इतर मैदानी खेळांची मोठी प्रेरणा मिळत आहे. स्वतः पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवल्याने, "इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते," हे दाखवून दीले आहे. अनिकेत पवार यांनी या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg