वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव उमेदवार प्रमोद गांधी यांच्या रुपाने जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आला, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्याकडून चांगले काम सुरु असून त्यांना सर्वसामान्य जनतेकडून चांगले सहकार्य मिळत असून पक्षही त्यांच्या पाठिशी आहे. भविष्यातील निवडणुकीत जिल्ह्यात मनसे आपले उमेदवार उभे करुन त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा ठाम विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला. मनसे नेते नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी संघटनावाढी संदर्भात कार्यकर्त्यांची आढावा बैठक शृंगारतळी येथील हेमंत हॉटेल येथे आयोजित केली होती. त्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन राजापूर पासून सुरू केले आहे.
दर दोन महिन्यांनतर आम्ही स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत माहिती घेऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्यापर्यंत आम्ही यामधला दुवा आहोत, असे स्पष्टीकरण मनसेचे नेते नितीन देसाई यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत, पक्षाला प्रतिसाद कसा आहे, याचा आढावा घेतला जात आहे. आमचे कार्यकर्ते चांगले काम करत आहेत मांत्र त्यांना आणखी काही आवश्यकता असल्यास काय करता येईल, याबाबत विचारणा करुन ते मनसे प्रमुखांपर्यंत पोहचवण्याचा आमचा उद्देश आहे. राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. राज्यातील जनतेला हे फारसे आवडलेले नाही. लोकांनी मतदान केले आहे ते पक्षाच्या विचारधारेवर आहे. त्यामुळे मतदानाचा अपमान केल्याची भावना मोठ्या प्रमाणात आहे. याचा फटका त्यांना बसणार आहेच. शिवाय लोकांच्या मनातील ही चीड पुढील निवडणुकीत नक्की दिसेल, असेही देसाई यांनी बोलून दाखवले.
जिल्ह्यात काम करणाऱ्यांना लोक पाठिंबा देतील, राज ठाकरेंच्या निष्ठावतांना जनता सहकार्य करून पुढच्या निवडणुकीत आमच्या मतदारांची संख्या वाढेल व भविष्यकाळात आमच्या निवडणुकांना प्रतिसाद मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी जे मत व्यक्त केले तेच आमचे मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वारंवार समोर येत असून स्थानिकांवरील अन्यायाविरुद्ध मनसे नेहमीच आक्रमक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तसेच सर्व उप तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष व मनसे सैनिक उपस्थित होते.











3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.