loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील २० वर्षीय युवक बेपत्ता; शोधासाठी पोलिसांचे आवाहन

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील कोडींवरे येथील शेकासन मोहल्ल्यातील २० वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत असून नागरिकांनी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौफीक तैमुर शेखासन (वय २०), रा. कोडींवरे, शेकासन मोहल्ला, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी हा युवक दि. २९ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

युवकाची आई उमेरा तैमुर शेखासन यांनी नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संगमेश्वर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर क्र. ०९/२०२६ अंतर्गत मंगळवारी (३० जून) सायंकाळी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी करीत असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना युवकाच्या शोधाबाबत बिनतारी संदेश पाठविण्यात आला आहे. या युवकाबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास संगमेश्वर पोलीस ठाणे किंवा तपास अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg