loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत उमराठ येथे गुहागर पोलीस स्टेशन तर्फे उमराठच्या जेष्ठ नागरिकांचा जन्मदिनी सन्मान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - "मिशन जीवन" अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या स्वाक्षरीने जिल्हय़ातील सर्व ६५ वर्षां वरील जेष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि समाधानाने परिपूर्ण असो, आपल्या चेहर्‍यावरचे हास्य असच खुलत राहो आणि आपला आशीर्वाद नेहमी आम्हाला लाभत राहो हीच मनःपूर्वक शुभेच्छा. अशा आशयाचा मजकुर वाढदिवसानिमित्त दिल्या जाणाऱ्या प्रमाणात वर लिहिलेला आहे. शिवाय रत्नागिरी पोलीस दलातर्फे जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी "मिशन प्रतिसाद" सुरू करण्यात आले असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक 8390929100 असेही नमूद केलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रत्येक जेष्ठ नागरिकांच्या वाढदिवशी जरी देता आले नाही तरी एका महिन्याभरात जन्मदिवस असलेल्या गावातील सर्व जेष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस त्या महिन्यात संबंधित पोलीस स्टेशनद्वारे साजरा केला जातो. असाच जून २०२६ मधील वाढदिवस असणाऱ्या गुहागर तालुक्यातील उमराठ गावच्या १७ जेष्ठ नागरिकांचा सन्मान मंगळवार दि. ३०.६.२०२६ रोजी ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला. या शुभेच्छा सन्मान कार्यक्रमात राजश्री भागोजी गावणंग, भागोजी महादेव गावणंग, शांताराम रत्नू गोरिवले, गंगाराम तानू गोरिवले, काशिराम पांडुरंग गावणंग, रूक्मीनी देवजी गोरिवले, विनायक बाळू कदम, देवजी तानू गावणंग, भागिर्थी देवजी गावणंग, शुभद्रा अर्जुन धनावडे, प्रकाश नारायण पवार, देवजी लक्ष्मण गोरिवले, पांडुरंग महादेव गावणंग, गंगाय गोपाळ गावणंग, भिकू लक्ष्मण मालप, प्रभावती गंगाराम गावणंग आणि महादेव भागोजी गावणंग अशा एकूण १७ जेष्ठ नागरिकांचा सहभाग होता.

टाईम्स स्पेशल

सदर वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमात गुहागर पोलीस स्टेशन तर्फे उमराठ गावाचा चार्ज असलेले हेदवी गावाचे पोलीस पाटील रविंद्र मोहित, ग्रामपंचायत उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर, गुहागर पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले व ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे भाऊ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व साईस दवंडे यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg